महविकास आघाडी सरकारची सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई- भाजपचा आरोप

पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोपनीय बदली अहवाल लीक केल्या  प्रकरणी पोलीसानी नोटीस दिली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी पुण्यात भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले.

हे निषेध आंदोलन पुण्यात महानगरपालिका जवळ करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले. या आंदोलनाला महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे पुणे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर, नगरसेवक धीरज घाटे ,गणेश घोष यांच्यासह भाजप, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनाच्या वेळी महविकास आघाडी सरकारने सूड बुद्धीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस चौकशीची नोटीस दिली म्हणून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

जगदीश मुळीक म्हणाले,महविकास आघाडी सरकारने सूड बुद्धीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस चौकशीची नोटीस दिली आहे.त्याचा आज आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री असताना त्यांनीच फोन टपिंग प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. नवाब मलिक यांचा राजीनामा आघाडी सरकार का घेत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी फक्त विकास केला.महविकास आघाडी सरकारने सूड बुद्धीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई केली असा आमचा आरोप आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा सरकारने मागे घ्यावा असे आम्ही या आंदोलनातून मागणी करत आहोत. असे जगदीश मुळीक म्हणाले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, नवाब मलिक यांनी खरंच राजीनामा दिला पाहिजे. नवाब मलिक यांच्यावर आम्ही ईडी मार्फत कारवाई केली. असा आरोप महा विकास आघाडी सरकारने केला आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात अडकून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. येथील पुढील काळात भाजप गप्प बसणार नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर गुन्हा मागे घ्यायला लावणारच. असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: