Friday, August 14, 2026
Latest NewsPUNE

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार का?

पुणे: पुण्यात मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून राज्यभरातील कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे लक्ष या वर्धापन दिनाकडे लागून आहे.

आज सायंकाळी  5 वाजता राज ठाकरे मनसैनिकांना संबंधित करणार आहेत . राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये स्वतः जातीने लक्ष घातले आहे.
राज ठाकरे या मुद्द्यांवर जास्त बोलण्याची शक्यता
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर भाष्य याबरोबरच मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत मनसेची भूमिका राज्यातील महाविकास आघाडीच्या 2 वर्षाच्या कारभारावर ओबीसी आरक्षणासंदर्भात मनसेची पुढील भूमिका मनसे – भाजप युतीसंदर्भात स्पष्टीकरण राज ठाकरे देणार का? हे बघावे लागणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading