Tuesday, October 6, 2026
Latest NewsPUNE

पुणे मेट्रो चे ‘मान्य (केंद्रीय) अनुदान’ कमी करू नका मोदीजी – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : काँग्रेसयुपीए काळातील मान्यता प्राप्त ‘पुणे मेट्रो ही नागपूर अगोदर मंजूर होऊन देखील, निव्वळ राजकीय कुरघोडीमुळे ३ वर्ष झालेल्या विलंबामुळे होणारा ‘वाढीव खर्च’ पुणे मनपा व राज्य सरकार अगोदरच सोसत आहे. पुन्हा त्यामध्ये “स्वारगेट ते कात्रज” मेट्रोचा केंद्राचा मान्य २०% निधी कमी करून तो १०% आणल्यामुळे सुमारे ५५० कोटींचा अतिरीक्त बोजा देखील राज्य सरकार, पुणे मनपा व पर्यायाने पुणेकर नागरीकांवरच पडणार आहे. याची गंभीर व संवेदनशीलपणे नोंद घेऊन पुणे मेट्रोचे ‘मान्य (केंद्रीय) अनुदान’ कमी करू नये, अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकात म्हटंले आहे की, ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पात ठरल्या प्रमाणे (२०% केंद्र सरकार + १०% राज्य सरकार. + १०% पुणे मनपा = ४०% + ६०% कर्ज) अनुदान द्यावे, ही कळकळीची विनंती. पुणे शहरात ‘भाजप’ने करोडोंच्या जाहीराती – होर्डिंग्ज व फ्लेक्स लावून आपले नेत्रदीपक स्वागत ही केले आहे. तसेच भाजप च्या १०० नगरसेवकांनी पुणे मनपा चे मानधन देखील आपल्या ‘खाजगी पीएम केअर फंडा’स दिले आहे. याची देखील मोदीजींनी नोंद घ्यावी. अन्  ‘पुणेकरांप्रती ऊदार धोरण’ स्वीकारावे. तसेच पुणे शहरात आपल्या शुभ हस्ते शुभारंभ झालेल्या “स्मार्ट सिटी” प्रकल्पाचा देखील ६ वर्षातील कामाचा आढावा घ्यावा, अशी पुस्ती देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात जोडली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading