आज दिवसभरात पुणे शहरात 78 कोरोना रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये तिसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी रोज सापडत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या शंभर च्या आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 78 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 215 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 60 हजार 074 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 50 हजार 23 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0 तर हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 943 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 57 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2969 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.