Saturday, November 21, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणू; व्ही मुरलिधरण यांचे पालकांना आश्वासन

पुणे : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या सात दिवसापासून युद्ध  सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी हे अडकले असून या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरण हे आज पुणे दौऱ्यावर आले असून पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी अडकले आहे त्यांच्या पालकांची आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरण यांच्यात बैठक झाली.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद उपस्थित होते. या बैठकीत पालकांना मुलं भारतात लवकरात लवकर आणू आणि असं आश्वासन यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरण यांनी दिलं आहे.

आमच्या मुलांशी आमचं सातत्याने बोलणं होत आहे. आज परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरण पुण्यात असताना आमची बैठक झाली. या बैठकीत आमच्या मुलांना लवकरात लवकर परत आणू, अस आश्वासन त्यांनी दिल आहे. तसेच बॉर्डर क्रॉस करताना मुलांना काहीही अडचण होऊ नये असं देखील आम्ही मंत्री महोदय यांना सांगितलं आहे. जे काही मारहाणीच सांगितलं जातं आहे. ते खरं आहे, अस देखील यावेळी पालकांनी सांगितलं आहे. तसेच अनेक घटना ज्या मुलांनी सांगितल्या आहेत त्या देखील यावेळी पालकांनी सांगितल्या.

आमच्या मुलांचे खूप हाल होतायेत
“युक्रेन मध्ये अजूनही आमची मुले अडकले आहेत.त्याचे खूप खाण्याचे व राहण्याचे हाल झाले. आम्ही बैठकीत मंत्रिमहोदयांना आमची मुले लवकरात लवकर भारतात आणावी अशी आम्ही मागणी केली. असे लक्ष्मण काची म्हणाले.” – लक्ष्मण काची (युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलाचे पालक)

Leave a Reply