Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

असंघटित क्षेत्रातील व्यक्तींनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – चंद्रकांत पाटील

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंघटित क्षेत्रातील व्यक्तींच्या अडचणी जाणून विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा कोथरुड मंडलच्या माध्यमातून गोसावी वस्तीतील नागरिकांना ई-श्रम कार्ड आणि कोविड लसीकरण स्मार्ट कार्ड देण्यात येत असून, या शिबीरास पाटील यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

यावेळी भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, योजना प्रमुख नगरसेवक अजय खेडेकर, पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, शिक्षण समिती अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, स्विकृत सदस्या अॅड. मिताली सावळेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी गरिबी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील व्यक्तींच्या अडचणी त्यांना चांगल्याच माहिती आहेत. त्यामुळे मोदीजींनी उज्वल गॅस योजना, आयुष्मान भारत योजना, ई-श्रम कार्ड योजना, सर्वांसाठी स्वच्छतागृह यांसारख्या अनेक योजना देशभरात राबविल्या. यापैकी आयुष्मान भारत योजनेमुळे अनेकांना मोफत औषधोपचार मिळाले. त्यामुळे या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई-श्रम कार्डचे वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय खेडेकर यांनी केले. सूत्रसंचालन पुनित जोशी यांनी केले. तर दीपक पोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading