Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मोदी सरकारने शहिद जवानांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ  काँग्रेस ची निषेध रॅली


पुणे: केंद्रातील मोदी सरकारने दिल्लीयेथील अमरजवान ज्योत विजवून तिचे नॅशनल वॉर मेमोरियलशी एकत्रीकरण करून शहिद जवानांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेस कमिटीकडून निषेध रॅली काढण्यात आली.
ही निषेध रॅली फरासखाना येथील हुतात्मा कर्णिक स्मारक ते लोकमान्य टिळक पुतळा, मंडई पर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅली चे नेतृत्व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.
या रॅलीच्या वेळी मोदी सरकारने दिल्लीयेथील अमरजवान ज्योत विजवून तिचे नॅशनल वॉर मेमोरियलशी एकत्रीकरण करून शहिद जवानांचा अपमान केल्याच्या निषेध करण्यात आला.
या रॅलीला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, नगरसेवक अभय छाजेड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी ,नगरसेवक अविनाश बागवे,  सोनाली मारणे, पूजा आनंद पुणे शहर काँग्रेस महिला शहराध्यक्षा, सुजाता शेट्टी, शोभना परळीकर, नंदाताई डावरे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, अंजली सोलापुरे, नीता टाळु, ताई कसबे, मंगला चव्हाण, पुणे शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले,1971 साली ज्या आमच्या जवानांनी भारत-पाकिस्तान लढाईत आपले प्राण गमावून भारताला युद्धात जिंकून दिले. त्याच जवानांचा केंद्रातील मोदी सरकारने दिल्लीयेथील अमरजवान ज्योत विजवून तिचे नॅशनल वॉर मेमोरियलशी एकत्रीकरण करून शहिद जवानांचा अपमान केल्या त्याचा निषेध आम्ही आज या आंदोलनातून करत आहोत.
मोहन जोशी म्हणाले, या मोदी सरकारने बाकीच्या गोष्टी सोडून जवानांबद्दल तरी नीट बोलावे.मोदी सरकारने दिल्ली येथील अमरजवान ज्योत विलीन करायला नको होती, म्हणून आज आम्ही या घटनेचा निषेध या आंदोलनातून करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading