fbpx

हेम कंपनीचे नवीन रीड डिफ्युजर बाजारात दाखल

पुणे : युरोपियन आणि आखाती देशातील प्रसिद्ध धूप काड्यांचे उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात आघाडीवर असलेल्या हेम कंपनीने, नवीन वर्षाचे औचित्य साधत रीड डिफ्युजर्स हे नवीन उत्पादन सादर केले आहे. या रीड डिफ्युजर्स मध्ये विविध प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण सुगंध आहेत . या सुगंधांमुळे घरचे वातावरण प्रसन्न होते आणि तुमच्या घरात चैतन्य व सकारात्मकता तयार होते. हेमचे रीड डिफ्युजर्स हे पूर्णपणे नैसर्गिक, हाताने तयार केलेले आहेत. केवळ नैसर्गिक घटक वापरून अत्यंत काळजीपूर्वक त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

परिसर ताजातवाना करण्यासाठी परिपूर्ण सुगंधनिर्मिती होण्यास या डिफ्युजरमुळे मदत मिळते. दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारची मनस्थिती आणि भावना जागृत करण्याच्या दृष्टीने हे सुगंध तयार करण्यात आले आहेत. या डिफ्युजरचा सुगंध ऊर्जा उत्सर्जित करत पसरत जातो ज्याने तुमचा मूड छान होतो तसेच तुम्हाला आतून ताजेतवाने वाटते. लेमनग्रास, ब्लॅक करंट, समर डिलाइट, फॉरेस्ट फ्लॉवर आणि पिंक ब्लूम ही या सुगंधांमध्ये डिफ्युजर उपलब्ध आहे .

या डिफ्युजर्सची किंमत ५ रीड स्टिक्ससह ४० मिलीलिटरची रीड डिफ्युजर ऑइलची १ काचेची बाटली रु.३९९ या किमतीत उपलब्ध आहे. हे उत्पादन अमेझॉन व सर्व प्रमुख रिटेलर्सकडे उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: