Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात 5 हजार 271 नवीन कोरोना रुग्ण

पुणे : पुणे शहरात मागील काही आठवड्यापासून कोरोनाची रुग्ण संख्या कमी अधिक होत आहे. पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 5 हजार 271 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6299 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 15 हजार 27 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 लाख 5 हजार 54 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 7 पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9206 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 45267 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 349 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 13225 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading