fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

शरद पवार कोरोनामुक्त व्हावेत; राष्ट्रवादीच्यावतीने दगडूशेठ हलवाई गणपती चरणी महाअभिषेक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे सर्वेसर्वा व अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते लवकर कोरोना मुक्त व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कसबा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी महाअभिषेक घालण्यात आला.

या वेळी प्रशांत जगताप शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर,नितीन सर्जेराव जाधव उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,कसबा विधानसभा मतदारसंघ,निलेश वरे, दीपक पोकळे, अजिंक्य पासलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कसबा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले,या कोरोनामुळे आपल्या जवळची माणसे गेली आहेत.आमचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे सर्वेसर्वा व  अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली .साहेब लवकरात लवकर बरे होवे ही आमची बाप्पा पाशी आम्ही इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading