Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

ग्रामीण भागामध्ये समाजाधिष्ठीत पर्यटनाची संकल्पना रुजणे आवश्यक: डॉ. धनंजय लोखंडे

पुणे : जागतिक स्तरावर झालेल्या जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरण यामुळे पारंपारिक सामाजिक जीवनाची संकल्पना बदलत आहे. विशेषतः सामाजिक ऐक्य व संस्कृती टिकवण्यासाठी ग्रामीण भागाचे महत्त्वाचे योगदान असुन आज शहरी भागांमध्ये कृत्रिम पद्धतीने ग्रामीण जीवनाच्या अनुभूतीचा देखावा सादर केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण व कृषी पर्यटनाद्वारे समाज, संस्कृती, साहित्य, लोककला समजून घेत समाजाधिष्ठीत पर्यटनाची संकल्पना रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. धनंजय लोखंडे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचे विभागीय पर्यटन कार्यालय पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील ट्रॅव्हल अँड टुरिझम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त मुळशी तालुक्यातील करमोळी येथे ‘ग्रामीण व समाजाधिष्ठीत पर्यटन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालिका सुप्रिया करमरकर – दातार, मुळशी तालुक्यातील कृषी पर्यटन केंद्र प्रमुख दत्ता शेळके, रामचंद्र भुमकर, उपसरपंच रुपाली साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुप्रिया करमरकर – दातार यांनी पर्यटन व्यवसायाची कास धरत ग्रामीण भागामध्ये आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होत गावचा विकास व कायापालट कसा होईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

गावातील संत सावता माळी मंदिरामध्ये आयोजित या कार्यशाळेसाठी सुमारे ८० ग्रामस्थ कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करत उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच झुम अॅप व यू – ट्युब लाईव्ह द्वारे या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading