Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

MPSC – तिसऱ्या उत्तरपत्रिकेत ही चुका; स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे: संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2020 मधील सेट A प्रश्न क्रमांक 17 ,27, 90 या तीन प्रश्नांची बरोबर उत्तर येत असताना देखील आयोगाने हे प्रश्न रद्द केले आहेत. (Set:-B,C,D मध्ये देखील अशा चुका आहेत.) आतापर्यंत आयोगाने तीन उत्तरतालिका प्रसिद्ध करून देखील त्यामध्ये चुका केल्या आहेत व पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. याचा फटका महाराष्ट्रातील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना बसला आहे.

याविरोधात स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज पुण्यात सदाशिव पेठेतील अहिला अभ्यासिके समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी महेश बडे, राहुल काळे ,धनंजय जाधव व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

राहुल काळे म्हणाले, याविरोधात काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु एमपीएससी आयोगाने न्यायालयात गेलेल्या फक्त 86 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे. आयोगाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे असे विद्यार्थ्यांचे मत आहे आयोगाने सुधारित चौथी उत्तरतालिका प्रसिद्ध करून अन्याय झालेल्या जवळपास तीन ते साडेतीन हजार विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विद्यार्थी सध्या करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading