मालेगाव खटल्याची सुनावणी जलद आणि निष्पक्षपणे करावी – शरद कुळकर्णी
पुणे : मालेगाव येथे झालेल्या 2008 बॉम्बस्फोटाचा निकाल अद्यापही लागलेला नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आदेश देऊन ही खटल्याची सुनावणी रखडलेली आहे. या खटल्याची सुनावणी जलद आणि निष्पक्षपणे करावी, अशी मागणी समीर शरद कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ खंडपीठाने एप्रिल 2015 मध्ये विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर न्यायाधीश एस. डी. टेकाळे, न्यायाधीश व्ही. एस. पाडाळकर आणि न्यायाधीश पी. आर. सित्रे यांच्या नियुक्तीअंतर्गत तीन विशेष न्यायालय झाली. मात्र, अद्यापही निर्णय लागलेला नाही. त्यामुळे यामध्ये आता जास्त वेळ न घालवता खटल्याची जलद सुनावणी घेऊन दैनंदिन पुर्ण वेळ सुनावणी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
