Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

राज्यसेवा पुर्व परीक्षा पेपरफुटीच्या विरोधात अभाविपतर्फे पुंगी बजाओ आंदोलन

पुणे : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षांचा गोंधळ चालला आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरण,  आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरण, अचानक पेपर रद्द होणे अशा अनेक विषयांनी विद्यार्थी त्रस्त आहेत. तसेच नुकतेच महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाचा नागपूर येथील पूर्व परीक्षेचा पेपर देखील फुटला. यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यास सरकारकडे कोणताच वेळ नाही. अनेकदा अशा प्रकारची पेपर फुटी होऊनही सरकार अजून गप्प आहे या विरोधात सरकार कोणतेही पाऊल उचलत नसून मुख्यमंत्री सुद्धा यावर काही बोलायला तयार नाहीत सरकारच्या या मनमानी कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डेक्कन येथील गुडलक चौकात  ‘पुंगी बजाव आंदोलन’ केले.

“परीक्षांच्या या पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये सुपे सारखे अनेक अधिकारी सहभागी आहेत. सरकारचा यावर काहीच वचक राहिलेला नसून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अभाविप कडून करण्यात आली, अन्यथा अभाविप आणखी तीव्र स्वरूपाची आंदोलने राज्यभर करेल,” असे प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले.

या वेळेस अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, प्रदेश सहमंत्री,अनिल ठोंबरे, महानगर मंत्री शुभंकर बाचल, सहमंत्री अमोल देशपांडे,कोथरूड भागसंयोजक शांभवी साले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading