अभाविप तर्फे मोफत वैद्यकीय सेवा शिबिर आणि जनजागृती अभियान
पुणे: अ.भा.वि.प डेक्कन नगर व जिज्ञासा पुणे महानगराद्वारे आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, पांडव नगर,वडारवाडी, पुणे येथील लोकांकरिता परिणामकारक आरोग्यसुविधा पोहोचवण्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा शिबिर व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.
जनसेवा हीच ईश्वर सेवा हे मनात ठेवून अभाविप आयोजित या आरोग्य शिबिरात संबंधित परिसरातील नागरिकांना प्राथमिक स्वरूपातील तपासणी करून आवश्यक ते सल्ले देण्यात आले.एकूण 35 रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. 1 वैद्य व 7 वैद्यकीय विद्यार्थी या शिबिरास उपस्थित होते. कोविड चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यासंबंधी घ्यावयाची काळजी व रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी या संबंधित मार्गदर्शन देखील या ठिकाणी करण्यात आले.
सोयीअभावी कुणीही उपचारापासून वंचित राहू नये व आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अ.भा. वि. प जिज्ञासा कटिबद्ध आहे.
यावेळी,अभाविप पुणे महानगरमंत्री शुभंकर बाचल, महानगर सर्व आयाम प्रमुख अभिजीत हुडेकर, कोथरूड भाग संयोजक शांभवी साले, डेक्कन नगरमंत्री यशराज फडके तसेच इतर नागरिक व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
