Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

पद्मविभूषण पं बिरजू महाराज यांना नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली


पुणे:कथक सम्राट पदम विभूषण पं बिरजू महाराज यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नंदकिशोर कल्चरल सोसायटी द्वारे आज  शोकसभा आयोजित केली होती.

यावेळी कार्यक्रमांच्या सुरुवातीला पं रामलाल, तालयोगी सुरेश तळवलकर, गुरू शमा भाटे, डॉ पं नंदकिशोर कपोते ,गुरू मनीषा साठे, उल्हासदादा पवार, राजेंद्र कपोते, चंद्रशेखर कपोते, अनिकेत कपोते यांनी पदम विभूषण पं बिरजू महाराज यांना पुष्पांजली अर्पण केली. पं सुरेश तळवलकर, पं रामलाल बरेठ, उल्हासदादा पवार , गुरू शमा भाटे , गुरू मनीषा साठे, पं नंदकिशोर कपोते, शांभवी दांडेकर,सुनील महाजन, ऋजुता सोमण, जतिन पांडे, सुनील सुंकारा, डॉ पूर्वा शाह या मान्यवरांनी पं बिरजू महाराज जींबरोबर घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला.

पं सुरेश तळवलकर यावेळेस म्हणाले “लयीवर महाराजजींचे विशेष प्रभुत्व होते.महाराज जी नृत्ययोगी होते. कथकची मोहर अजरामर केली ते महाराज जी” , उल्हासदादा म्हणाले ” सर्व नृत्यांवर महाराज जीनी प्रेम केले.त्यांचे मंचावर येणे व वावरणे प्रभावशाली होते. यावेळी त्यांनी लावणी सम्राज्ञी यमुनाबई वाईकर आणि महाराज जी यांची जुगलबंदी ची आठवण सांगितली. रायगढ घराण्याचे गुरु पं रामलाल बरेठ म्हणाले, बिरजू महाराज जीनी वडील अच्छन महाराज व काका लच्छु महाराज व शंभू महाराज यांच्या तिन्ही शैलीतून एक सुंदर कथक नृत्य निर्माण केले. पूर्वी नृत्यात ज्या कमी होत्या त्या महाराज जीनी काढून कथकला एक सुंदर दिशा दिली. यावेळी पं बिरजू महाराज जी यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या व त्यांच्यावर लिहिलेल्या नृत्यासम्राट पं बिरजू महाराज या पुस्तकावर आधारित दिनदर्शिका प्रकाशित करून महाराज जीना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिरा पाटणकर यांनी केले.

Leave a Reply