Pune – नवले पुलाजवळ २४ तासामध्ये दोन अपघात; दोन जणांचा मृत्यू
पुणे : पुण्यातील मुंबई – बंगलूरू हायवे वर असणाऱ्या नवले पुलावर पुन्हा गेल्या २४ तासामध्ये दोन अपघात झाले आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कात्रज कडून नवले पुलाकडे येत असणाऱ्या एका महिलेला ट्रकने धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. पूजा निलेश कांबळे (वय ३०) असे या महिलेचे नाव होते.
त्यानंतर पून्हा मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास नवले पुलाजवळील अण्णा वडेवाले या दुकानासमोर एका बोअरवेल ट्रकने एका वृद्ध इसमास धडक दिली. यामध्ये डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विजय रंगनाथ कुलकर्णी (वय ७०) असे त्यांचे नाव होते. सिंहगड पोलिसांनी या अपघातातील बोअरवेल चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.
