Tuesday, September 15, 2026
BusinessLatest NewsPUNE

झेडएफ इंडिया प्रा. लि.कडून वाहतूक सुरक्षेला प्राधान्‍य

पुणे : झेडएफ इंडिया प्रा. लि.ने आज वाहतूक सुरक्षा सप्‍ताहाचा भाग म्‍हणून चाकण, पुणे येथील वाहतूक पोलिस विभागाला वाहतूक सिग्‍नल यंत्रणा समर्पित केली. चाकण येथील दोन महत्त्वाच्‍या ठिकाणी स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या या वाहतूक सिग्‍नल यंत्रणा प्रवासी व वाहतूक पोलिसांवरील तणाव कमी करण्‍यामध्‍ये मदत करतील. एचपी स्‍क्‍वेअर व एण्‍ड्युरन्‍स स्‍क्‍वेअर या भागांमध्‍ये सायंकाळच्‍या वेळेला जवळपास ३ तास वाहतूक पोलिसांना मॅन्‍युअली वाहतूकीवर नियंत्रण ठेवावे लागते. चाकण औद्योगिक क्षेत्रामध्‍ये ये-जा करणा-या प्रवाशांना नेहमीच येथे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.

या वाहतूक कोंडीमुळे चाकणमधील उत्‍पादन केंद्रांमध्‍ये कामावर असलेल्‍या कर्मचा-यांवर अतिरिक्‍त ताण निर्माण होण्‍यासोबत वेळ देखील वाया जातो. या वाहतूक कोंडीचा विभागातील वाहतूक पोलिसांवर अधिक तणाव निर्माण होतो आणि चालक देखील चुकीच्‍या पद्धतीचा अवलंब करतात. चालकांनी चुकीच्‍या पद्धतीने ड्रायव्हिंग करण्‍याचा मार्ग अवलंब्‍यामुळे प्रवाशांचा या ठिकाणी ४० मिनिटांहून अधिक वेळ खोळंबा होतो.
वाहतूक सिग्‍नल यंत्रणेची समर्पितता हा झेएफ इंडिया प्रा. लि. सीएसआर उपक्रमाचा भाग आहे, जेथे आम्‍ही रस्‍ता, पादचारी व वाहतूक स्थितींबाबत सुरक्षितता व जागरूकतेला चालना देतो.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील, एस.आर. पीआय अरविंद पवार, आणि पीआय श्री मच्छिंद्र अडलिंग, सर्वांनी समर्पण सोहळ्याला उपस्थिती लावली.
झेडएफ इंडिया प्रा. लि.चे अध्‍यक्ष श्री. सुरेश के.व्‍ही. म्‍हणाले, ”झेडएफ प्रवाशी व पादचा-यांच्‍या सुरक्षिततेला महत्त्व देते. आमच्‍या सीएसआर उपक्रमाचा भाग म्‍हणून सुरक्षिततेला चालना देणे आणि चाकणमधील व बाहेरील या दोन प्रमुख ठिकाणी व्‍यक्‍तींचा वाया जाणारा वेळ या समर्पिततेसाठी प्रमुख स्रोत ठरले. आम्‍ही ही वाहतूक कोंडी व त्‍यामुळे निर्माण होणा-या तणावाचे निराकरण करण्‍यास उत्‍सुक आहोत. आम्‍हाला रस्‍ता सुरक्षा सप्‍ताहादरम्‍यान व्यापक वाहतूक सुरक्षा उपकमाचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आशा करतो की, ही समर्पितता चाकणमधील रस्‍त्‍यांना प्रवाशांसाठी सुरक्षित व अधिक आनंददायी बनवेल.”
एसीपी कु.प्रेरणा कट्टे यांनी सांगितले , ”चाकण हे पुण्‍यामधील वर्दळीचे व सर्वात महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. येथील जागतिक दर्जाचे उद्योगक्षेत्र आणि कार्यरत कर्मचा-यांची संख्‍या पाहता येथील वाहतूक प्रत्‍येक प्रवाशासाठी सुलभ असणे महत्त्वाचे आहे. मी या उपक्रमासाठी झेडएफ इंडिया प्रा. लि.चे आभार मानतो आणि या सिग्‍नल यंत्रणांसह उत्तमरित्‍या वाहतूक नियंत्रण होण्‍याची अपेक्षा करतो.”
एसीपी श्री नंदकिशोर भोसले पाटील यांनी नमूद केले, “झेडएफ इंडियाने या वर्षाची सुरुवात एका चांगल्या उपक्रमाने केली आहे. हा चौक आणि पुढचा रस्ता वाहतुकीसाठी नेहमीच महत्त्वाचा मार्ग राहिला आहे. यामुळे केवळ प्रवाशांचाच नाही तर लगतच्या कंपन्यांचाही वाहतुकीचा ताण कमी होईल. मला असे वाटते की असे चांगले उपक्रम या क्षेत्राच्या आसपासच्या कंपन्यांच्या CSR अंतर्गत चालू राहतील, ज्यामुळे परिसरातील आणि आसपासच्या लोकांमध्ये फरक पडेल.”
Snr पीआय श्री. अरविंद पवार यांनी या समस्येच्या तळागाळात जाऊन अधिकाधिक कंपन्यांनी सामील होऊन सामाजिक बदल घडवण्याची गरज आहे यावर भर दिला. त्यांनी नमूद केले की, ZF इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने, त्यांच्या CSR उपक्रमांतर्गत ट्रॅफिकसह केलेल्या कामामुळे प्रवाशांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल आणि वाहतूक पोलिसांना त्यांच्या संसाधनांचा इष्टतम रीतीने वापर करण्यास मदत होईल.
झेडएफ इंडिया प्रा. लि. हे सिग्‍नल्‍स वाहतूक पोलिस चाकण यांच्‍याप्रती समर्पित करते आणि चाकणमधील प्रवास व वाहतूक सुविधा सुलभ करण्‍याप्रती त्‍यांची समर्पितता व अथक मेहनतीसाठी त्‍यांचे आभार मानते. गेल्‍या वर्षी झेडएफ इंडिया प्रा. लि.ने आसपासच्‍या शाळांमधील शालेय विद्यार्थ्‍यांना मुलभूत वाहतूक सुरक्षा आणि वाहतूकीच्‍या नियमांचे पालन करण्‍याची गरज याबाबत जागरूक करण्‍यासाठी त्‍यांच्‍या सीएसआर निधीचा एक भाग समर्पित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading