लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करा अन्यथा आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा
पुणे: शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साधारण रोजची पॉसेटिव्ह रुग्णांची संख्या चार हजारावर गेलेली आहे. कोरोनाची तीसरी लाट जर थोपवायची असेल तर जातीत जास्त लानीकरण केंद्र मनपाने सुरु करणे गरजेचे आहे १३ वर्ष ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्यास तसेच करणे” फ्रंट लाईन वर्कसना व तसेच ६० वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देणेबाबत परवानगी देण्यात आली आहे, मनपाने सुद्धा अनेक लसीकरण केंद्रांवर ही सुविधा सुरु केली आहे. परंतु या लसीकरण केंद्रांवर अद्यापही आवश्यक ते डॉक्टर नर्स, ऑपरेटर व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे लालीकरण केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून .अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. व गर्दीला नियंत्रण करने आवश्यक होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद सुद्धा होते आहेत. आपण लसीकरण केंद्रांवर आवश्यक ते डॉक्टर, नर्स, ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांची त्वरीन नेमणूक करावी, व ही नेमणूक करताना कमीत कमी सहा महिन्यांसाठी करावी. अन्यथा “शिवसेना” पक्षामार्फत आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा इशारा पृथ्वीराज सुतार, (गटनेते शिवसेना पक्ष) यांनी दिला आहे.
