जेष्ठ व्हायोलीन वादक पं.भालचंद्र देव यांचे निधन
पुणे : जेष्ठ व्हायोलीन वादक पं.भालचंद्र दामोदर देव यांचे आज पहाटे ३ वाजता निधन झाले.. ते ८६ वर्षांचे होते.
त्यांच्यामागे पत्नी निला देव, कन्या आणि शिष्या चारुशीला देव, मुलगा चित्तरंजन देव आहेत.. त्यांचेवर सकाळी दहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत..
दोनच दिवसांपूर्वी ९ जानेवारीला त्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता..त्याच कार्यक्रमात अचानक त्यांची तब्येत बिघडली ..तातडीने दिनानाथ मध्ये हलविले .नंतर संजीवनी रुग्णालयात आय सी यु मध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले..त्यातच त्यांची तब्येत बिघडली..रात्री ३च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला..
पं. भालचंद्र देव नाना म्हणून संगीत क्षेत्रात ओळखले जात. पं. गजाननराव जोशी यांचे ते शिष्य.. पुण्यात त्यांनी अनेकविध कार्यक्रमतुन साथ केली. भारत गायन समाजात पन्नास वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना व्हायोलीनचे धडे दिले..
आजही ते अनेकांना व्हायोलिन शिकवीत होते. शिस्तशीर आयुष्य आणि गुरुंवरची अढळ श्रद्धा हेच त्यांचे प्रमुख गुण होते..ते आदर्शवत आयुष्य जगले..
