Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

कर्तृत्ववान महिलांना उद्योगिनी पुरस्कार देऊन सन्मान

पुणे : महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला उद्योगिनी समूहाचा उद्योगिनी सन्मान २०२२ सोहळा नुकताच पार पडला. उद्योगिणी समोहाच्या संचालिका पल्लवी वागस्कर यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मेघराज  भोसले चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, निर्माते अभिनेते बाळासाहेब अमराळे, डॉ. उद्योजक विठ्ठल सातव, मनेश घुले पाटील, प्रीतम भळगट, दिग्दर्शक रामकुमार शेडगे, पोलीस अधिकारी, मनीषा तुळे, मृणालिनी कालेकर, सुजाता गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी प्रसंगी बोलताना उद्योगिनी फाउंडेशनच्या संस्थापिका पल्लवी राहुल वागस्कर म्हणाल्या की विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या  उद्योग ,व्यवसाय, कलाकार अशा १६ महिलांचा सन्मान करण्यात आला, उद्योगिनी हा समोह फेसबुकचा ग्रुप आजच्या घडीला २४ हजार झाला आहे.
 
सदरील महिलांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. अशी माहिती पल्लवी वागस्कर यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading