Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुढील आठवड्यात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

पुणे : गेल्या दोन आढवड्यांपासून राज्यात थंडी आणि पाऊस यांचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे. अवकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने कालपासून बोचरी थंडी जाणवू लागली आहे. त्यातच उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. येत्या आठवड्यात याची तीव्रता आणखी वाढणार असून राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

गेल्या दोन आठवड्यां पासून राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. आजही विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मात्र या पावसामुळे थंडीची तीव्रता ही अधिक वाढली आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. त्यातच उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. या काळात जिल्ह्यात वातावरण कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

आज पुणे शहरात नोंदवण्यात आलेले किमान तापमान – 
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1480749528886038529?s=20

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading