Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

चिंताजनक : आज दिवसभरात पुणे शहरात 412 नवीन कोरोना रुग्ण

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या खूप वाढली असून पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 412 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 95रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 10 हजार 218 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 99 हजार 303 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 3 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9116 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 1799 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 92 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6944
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading