Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

पुणे महानगरपालिका निवडणूक रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूकित पक्षाची आघाडी का युती होणार? हे अजून ठरले नाही. त्यावर आम्ही पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

आज राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधले.

महादेव जानकर म्हणाले, नगरपालिका नगरपंचायत व महानगरपालिका निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावर लढत राहिला आहे. आम्ही आमचा पक्ष अख्ख्या भारतात स्वबळावर लढत आहोत.

ओबीसी आरक्षण वर महादेव जानकर म्हणाले, राज्य सरकार व केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण ने ओबीसी समाजाला पूर्णपणे दिले नाही. त्याविरुद्ध आमचा लढा चालूच राहणार आहे. इथून पुढील काळात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. असा इशारा त्यांनी राज्य सरकारला व केंद्र सरकारला दिला.

महा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महा विकास आघाडी सरकारने काही काम केले नाही, अशी टीका विरोधी पक्ष करत असतात. त्यावर जानकर म्हणाले, महा विकास आघाडी सरकार सत्तेत आले पण त्यांना कोरोना या महामारी चा सामना करावा लागला. जरी आम्ही सत्तेत आलो असतो तरी. आम्हालाही कोरोना या महामार्ग चा सामना करावा लागला असता, असे जानकर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading