Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला डिसेंबरअखेरच दीड हजार कोटींचे विक्रमी उत्पन्न

पुणे : कोरोना आपत्तीमध्ये पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काळात महापालिकेच्या बांधकाम विभागाला उत्पन्न प्राप्तीमध्ये मोठा फटका बसला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) बांधकाम विभागाच्या उत्पन्न वाढीत विक्रमी वाढ झाली असून, या विभागाने डिसेंबरअखेरच १ हजार ५२७ कोटी ७३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मार्च,२०२२ अखेरपर्यंत बांधकाम विभागाला १ हजार १८५ कोटी ६ लाख रूपयांचे महसुल प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात या विभागाने ३१ डिसेंबर,२०२१ पर्यंतच अतिरिक्त ३४२ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले असून, एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे उत्पन्न १२८़९२ टक्के इतके असल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

कोरोनामुळे गतवर्षी बांधकाम विभागाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. मार्च, २०२१ अखेर या विभागाला उद्दिष्टापेक्षा केवळ ५० टक्के उत्पन्न प्राप्ती झाली होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर पहिल्या काही महिन्यामध्ये बांधकामाचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान राज्य सरकारनेही बांधकाम विभागाला चालना मिळावी यासाठी, नोंदणी शुल्कात १ टक्यांनी कपात केली. यामुळे बांधकाम परवान्याच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या प्रीमियम एफएसआयच्या शुल्कात ५० टक्के सवलत दिल्यामुळे शहरातील बांधकामाचे प्रस्ताव वाढले गेले. सरकारकडून मिळालेली ही सवलत योजना ३१ डिसेंबर, २०२१ अखेरपर्यंत होती़ परिणामी शेवटच्या महिन्यात सुमारे ४०० कोटींचे उत्पन्न बांधकाम विभागाला मिळाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading