fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

आप महाराष्ट्र हेल्थ विंगचा निवासी डॉक्टरांना पाठिंबा

पुणे : आप महाराष्ट्र हेल्थ विंग निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभी आहे आणि दिल्लीतील निवासी डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या कठोर, असभ्य वागणुकीचा तीव्र निषेध करत आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून या घटनेची चौकशी करावी अशी आमची मागणी आप महाराष्ट्र हेल्थ विंगने केली आहे. तसेच NEET समुपदेशन प्रक्रिया अजून उशीर न करता पूर्ण करावी, अशी मागणीही केली आहे.

आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या हेल्थ विंगच्या काल झालेल्या साप्ताहिक बैठकीत NEET समुपदेशन आणि महाराष्ट्र व देशभरातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन, संप यासंबंधीच्या सद्य परिस्थितीवर चर्चा केली.

आपचे डॉ. संतोष करमरकर राज्य संयोजक व डॉ. अभिजित मोरे म्हणाले की, कोविड साथीच्या तिसर्‍या लाटेचा फटका आपल्याला बसत असतानाही, केंद्र सरकार नवीन PG निवासी डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात (NEET समुपदेशनाद्वारे) प्रचंड दिरंगाई करत आहे. ही खरोखरच दुःखाची गोष्ट आहे. या निवासी डॉक्टरांना देशभरातील सार्वजनिक रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांच्या कार्य दलात तातडीने सामील करणे आवश्यक आहे. आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ हा पेच प्रसंग सोडवावा आणि निवासी डॉक्टरांची संपूर्ण न्याय्य मागणी मान्य करावी, अशी मागणी आम्ही केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading