Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

दिल्लीमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ससून रुग्णालया बाहेर डॉक्टरांचे आंदोलन

पुणे : दिल्लीमध्ये रुग्णालया बाहेर काही निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी आपल्या बळाचा वापर केला. यामध्ये काही डॉक्टर जखमी झाले याचा निषेध देशभर होत आहे. आज पुणे येथे ससून रुग्णालय बाहेर काही डॉक्टरांनी आंदोलनाचे हत्यार उपासले. कोरोना महामारीच्या लाटेमध्ये डॉक्टरांना पुरेसा मनुष्य बळ मिळत नाही. एका वॉर्ड मागे दोन डॉक्टरचा राऊंड लावला जातो पुरेसा मनुष्य मिळत नसल्याने आज डॉक्टरांनी आज आंदोलन केले. ससून रुग्णालयातील डॉक्टर या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ससून रुग्णालयाचे डॉक्टर अरविंद जोशी म्हणाले, दिल्लीमध्ये रुग्णालया बाहेर काही डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत होते त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर आंदोलन हाणून पाडण्यासाठी आपल्या बळाचा वापर केला. यामध्ये काही डॉक्टर जखमी झाले. डॉक्टरांवर हल्ला झाला हे एकदम चुकीचे आहे. कोरोना महामारीत डॉक्टर हे जीवाची पर्वा न करता चोवीस तास काम करत होते. सरकारने डॉक्टरांची नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही पुढील काळात तीव्र आंदोलन करू, असे डॉक्टर अरविंद जोशी यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांवर येणाऱ्या कामाच्या तानाचा विचार करता सध्या कार्यरत असणारा डॉक्टर स्टाफ हा कमी आहे. त्यामुळे NEET PG कान्सिली लवकरात लवकर करून निवासी डॉक्टरांची भारती करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून मूळ निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.

Leave a Reply