Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात तीन दिवसीय सरहद कारगिल महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

पुणे : सरहद संस्थेच्या वतीने 1999 सालापासून कारगिल मधील विद्यार्थी व दहशतग्रस्त नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून प्रतिवर्षी सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. त्याला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळतो.
कारगिल ला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्यापासून तीन दिवस
सरहद कारगिल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत
सरहद कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन चे  मुख्य आयोजक संजीव शाह यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला  संयोजक डॉक्टर शैलेश पगरिया, संजय नहार संस्थापक अध्यक्ष सरहद
उपस्थित होते.

संजीव शाह म्हणाले, यासाठी लेह ऑटोनॉमस, डेवलपमेंट कौन्सिल, कारगीलचे चेअरमन फिरोज खान, कार्यकारी अध्यक्ष आगा सय्यद, ऑल कारगील टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अली, तसेच तेथील नगरपालिका तसेच ऑलिंपिक असोसिएशनचे पदाधिकारी पुण्यात येत आहेत. उद्या म्हणजे 29डिसेंबर 2021 रोजी 12 वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा पत्रकारांशी वार्तालाप आयोजित केला असून. त्यानंतर सरहद संस्थेत भेट त्यानंतर सायंकाळी पुण्यातील ट्रॅव्हल्स टूर कंपनीची चर्चा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी एस एम जोशी फाऊंडेशन येथे 5.30 वा. सरहद कारगिल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून. पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन कळमकर, तसेच महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading