Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

इंदिरानगर, बर्माशेल वस्तीतील विविध समस्यांबाबत प्रशासन विरोधात धडक मोहीम

पुणे : ऍड. रेणुका चलवादी व त्यांचे समर्थक यांचे वतीने इंदिरा नगर येथिल खेसे विद्यालय या शाळेमध्ये अचानक पाहणी केली असता सदर शाळेमध्ये मुलांना बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय व परिसर स्वच्छता तसेच क्रीडांगण या प्रकारच्या कोणत्याही सुविधा दिसून आल्या नाही. तसेच डेंगू मलेरिया सदृश्य मच्छर , डास व अस्वच्छ पाणी तसेच छतगळती दिसून आली.
विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली असता गेल्या कोविडच्या काळामध्ये सदर विध्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षणाची मुभा मिळाली नाही. तसेच, या २ वर्षांमध्ये पोषक आहार देखील मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले. रेणुका चलवादी यांनी शाळेमध्ये अचानक भेट घेतली असता दुपारी १२ वाजता भरणाऱ्या शाळेमध्ये दीड वाजेपर्यही मुले येत असताना दिसून आली. हे दृश्य पाहून जीवाची हळहळ झाली कारण अनेक मुलांच्या पायामध्ये चप्पल ही नव्हती. त्यांच्या अंगावर शालेय युनिफॉर्म नव्हता व त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नीटनेटकेपणा नव्हता. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याची खंत यावेळी वाटली.


एडवर्ड रॉक पॉल या मनपा च्या दवाखान्यास भेट दिली असता कोरोनाच्या महामारीच्या काळात त्या दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा दिसून आली आंही. उलट ५००० लोकसंख्या असलेल्या या वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या दवाखान्यामध्ये बीएचएमएस डॉक्टर उपलब्ध होते. पुणे मनपाच्या सर्व नगरसेवकांनी प्रसूतिगृहाचे उदघाटन केले. परंतु प्रत्यक्षात त्या दवाखान्यामध्ये पाहणी केली असता तेथे फक्त खोकल्याच औषध मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथे दवाखाना असल्याचे वाटत नव्हते. त्यामुळे कोरोना काळात व इतरही वेळेस नागरिकांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत व उपचार झाल्याचे आढळून आले नाही असे निदर्शनास आले. रेणुका चलवादी यांच्यावतीने ही मोहीम राबवित असताना डॉक्टर व शाळेतील शिक्षकांना विचारणा करण्यात आली. भविष्यामध्ये जनतेचे व शालेय विद्यार्थ्यांचे नुष्कान होऊ नये या संदर्भात त्यांना जाब विचारण्यात आला.
वस्तीमध्ये फेरफटका मारत असताना १९८० मधील ही वस्ती असून त्याठिकाणी वाल्मिकी, रमाई आंबेडकर योजना व इतर कोणतेही शासकीय योजना राबविण्यात आले नसल्याचे दिसून आले. तसेच, मूलभूत सुविधा असणारे ड्रेनेज, पाणी, रस्ते, सुलभ शौचालय याचे मोठ्या प्रमाणात दुरवस्था दिसून आली. मनपाचे नियोजन नसल्यामुळे रस्त्यावरच शौचालय बांधण्यात आले. तसेच, आपत्कालीन काळात फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स या ठिकाणी जाऊ शकत नसल्याचे दिसून आले. यावेळी रेणुका चलवादी व त्यांच्या समर्थकांनी अनेकांना विचारल्यावर आमचे नगरसेवक कोण आहे आहे तेही त्यांना माहीत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच, वस्तीकडे कोणत्याही नगरसेवकांचे लक्ष नाही, आम्ही अस्वच्छ जीवन जगत आहे. अद्यापही आमची वस्ती घोषित नाही, वस्तीमधून २०० फुटाचा रस्ता टाकण्याचे कटकारस्थान केल्याचे यावेळी नागरिकांनी रेणुका चलवादी व त्यांचे समर्थक व पत्रकार , मीडिया यांच्यासमवेत सांगितले. त्यामुळे रेणूकताई अत्यंत संतप्त झाल्या. हे सर्व महापालिकाच्या हलगर्जीपणामुळे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर सचिन चौगुले, बलभीम पावर, हौसराम आल्हाट , अजय चलवादी, शानु चलवादी, लकी चलवादी, राम चलवादी, बाळू जाधव, श्रीकांत चौगुले, जामवंत झेंडे, संतोष चलवादी, सुरेखा , सुनिता माने, आदी उपस्थित होते. कळावे,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading