Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

वसुंधरा संवर्धनाचा मूलमंत्र पुढील पिढीकडे सोपवावा : स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील

पुणे : निसर्ग जपला असता तर मास्क लावून निसर्गापासून तोंड लपविण्याची वेळ आपल्यावर आली नसतीनिसर्गाची जपणूक करताना पाण्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहेवसुंधरा संवर्धनाचा मूलमंत्र जपून तो पुढील पिढीकडे सोपवावाअसे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी केलेपर्यावरण रक्षण आणि आरोग्य साक्षरतेतून राष्ट्रभक्तीची जपणूक करणार्या अशा छोट्या संमेलनांनाही शासनाने अनुदान द्यावेअशी मागणीही त्यांनी केली.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांना महिला सक्षक्तीकरणात दिलेल्या योगदानासाठी तर पुण्याचे माजी उपमहापौर डॉशंकरराव तोडकर यांना समाजसेवेबद्दल जीवनगौवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वेळी मोहिते पाटील बोलत होत्यासंमेलनाध्यक्ष डॉरामचंद्र देखणे आणि समारोप सत्राचे अध्यक्ष विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले.

संमेलनाचे संयोजक ट्रस्टचे विश्वस्तदेशभक्तकोशकार चंद्रकांत शहासनेस्वागताध्यक्ष डॉबबन जोगदंडधर्मादाय सहआयुक्त सुमुबुक्केवनसंरक्षक रंगनाथ नाईकडेॅडनंदिनी शहासनेडॉजयश्री तोडकर आदी व्यासपीठावर होतेमानपत्राचे वाचन माया प्रभुणे आणि चंद्रकांत शहासने यांनी केलेडॉतोडकर यांच्या वतीने डॉजयश्री तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

समारोप समारंभात बोलताना अनंत ताकवाले म्हणालेमानवासह संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांनी बनली आहेआपल्यावर त्यांचे ऋण आहेया ऋणांची परतफेड करण्यासाठी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले पाहिजेवृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही सुद्धा राष्ट्रभक्तीच आहेआपल्या कृषीप्रधान देशात उद्योगशिलतेलाही महत्त्व आहेउद्योगशीलतेचे महत्त्व शिक्षणाद्वारे जो पर्यंत सांगितले जात नाही तो पर्यंत श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाहीज्या वेळी श्रममूल्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न होतील त्या वेळी समानता प्राप्त होईल.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक  प्रशस्तीपत्र वाटप ज्येष्ठ विचारवंत श्याम भुर्के यांच्या हस्ते करण्यात आलेपर्यावरण आरोग्य आणि राष्ट्रभक्ती या विषयी काम करणार्यांना धर्मादाय सहआयुक्त सुमुबुक्के यांनी मार्गदर्शन केलेसमारोप सोहळ्यानंतर बाबासाहेब ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading