Friday, May 29, 2026
BusinessLatest News

ईव्हीटीआरआयसी मोटर्सद्वारे उच्च गती प्रकारातील दुचाकींच्या 3 उत्पादनांचे अनावरण

मुंबई : ईव्हीटीआरआयसी मोटर्स – ह्या इलेक्ट्रिक वाहन जगतामधील नवीन व्हेंचरने ग्रेटर नॉयडा येथील इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये ईव्ही‌ इंडिया एक्स्पो 2021 मध्ये उच्च वेग प्रकारामधील आपल्या तीन इलेक्ट्रीक दुचाकींना समोर आणले ज्यामध्ये ईव्हीटीआरआयसी राईज (मोटरसायकल), ईव्हीटीआरआयसी माईटी (स्कूटर) आणि ईव्हीटीआरआयसी राईड प्रो (स्कूटर) ह्यांचा समावेश होता. ह्या ब्रँडने ह्या प्रसिद्ध ईव्ही एक्स्पोच्या महत्त्वाच्या मंचावर विशेष अशा ऑफर्सची माहिती‌ दाखवली आणि आकर्षक डिझाईनसह अद्ययावत तंत्रज्ञान असल्यामुळे त्यांना प्रेक्षकांनी विशेष पसंती‌ दिली.

ईव्हीटीआरआयसी राईज – ही‌ उच्च वेगाची मोटरसायकल ह्या ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक दुचाकी आहे व त्यामध्ये आकर्षक स्टाईलसह उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आहे. अनेक युजर्ससाठी चार्जिंग ही अडचणीची बाब असल्याचे लक्षात आल्यामुळे, ब्रँडने ह्या बाईकसह 3.0 KWH लिथिअम आयन डिटॅचेबल बॅटरी दिली आहे व अशा प्रकारे चार्जिंग करणे सुलभ झाले आहे. ही बाईक 100 किमी/ तास ही सर्वोच्च गती घेऊ शकते व एका चार्जवर ही 120 किमी अंतर कापण्यासाठी समर्थ आहे.

ईव्हीटीआरआयसी मायटी– ब्रँडच्या ह्या उच्च वेगाच्या स्कूटरमध्ये रायडर्ससाठी आरामदायक आणि उत्तम सुविधा आहेत. ती सहजपणे 70 किमी/ तास इतका सर्वाधिक वेग घेऊ शकते व एका वेळेसच्या चार्जिंगवर 90 किमी अंतर जाऊ‌ शकते.

ईव्हीटीआरआयसी राईड प्रो ईव्हीटीआरआयसीद्वारे आणली गेलेली ही आणखी एक वेगवान स्कूटर आहे व तिची सर्वाधिक गती 75 किमी/ तास आहे व ती 90 किमी अंतर पार करते.  ह्या वर्षी ऑगस्टमध्ये मार्केटमध्ये आलेल्या व आधी शुभारंभ झालेल्या ब्रँडच्या ईव्हीटीआरआयसी राईड स्कूटरची ईव्हीटीआरआयसी राईड प्रो ही विकसित वर्शन आहे.

ईव्हीटीआरआयसीच्या सहभागाविषयी बोलताना ईव्हीटीआरआयसी मोटर्सचे संस्थापक आणि एमडी मनोज पाटील ह्यांनी म्हंटले, “भारतातील ईव्ही दुचाकी उद्योगामध्ये दर्जा उंचावणारी उत्पादने आणणा-या गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी संपूर्ण ईव्हीटीआरआयसी टीम अनेक प्रयत्न करत आहे. उद्योगातील विशेषज्ञ, प्रेक्षक, ऑटो विशेषज्ञ आणि युजर्सकडून विशेष कौतुक व मान्यता मिळणा-या लक्षणीय नावीन्यपूर्णतांना समोर आणण्यासाठी ह्या ईव्ही एक्स्पो 2021 ने आम्हांला परिपूर्ण संधी मिळवून दिली. मार्केटचे सखोल अध्ययन करून आणि ग्राहकांचा अभिप्राय जाणून घेतल्यावर आम्ही ह्या उत्पादनांची श्रेणी बनवली आहे. भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने नवीन आहेत आणि अद्याप खूप काही केले जाणे बाकी आहे. परंतु जर ग्राहकांची मानसिकता योग्य प्रकारे लक्षात घेतली गेली नाही, तर उद्योगामधील एकूण विकास दर कमी होईल. .

ह्या ब्रँडने आधीच भारतभरामध्ये 70 पेक्षा जास्त वितरकांचे मजबूत नेटवर्क उभे केले आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत 150 वितरक हे त्यांचे उद्दिष्ट आहे. प्रसिद्ध अशा ईव्ही इंडिया एक्स्पो 2021 मधील सहभागामुळे हे होण्यास सहाय्य मिळेल आणि ब्रँड सर्वांशी संवाद करेल आणि आपल्या जमेच्या बाजू समोर ठेवेल. महाराष्ट्र, गुजरात, तमिळ नाडू, आंध्र, तेलंगणा, केरला, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली- एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 2021- 22 ह्या आर्थिक वर्षामध्ये लक्षणीय उपस्थिती बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading