Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

विधानसभा अध्यक्ष ठरविण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांसाठी बंधनकारक असतो – उल्हास बापट

पुणे : विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी राज्यात सत्तेत असणाऱ्या महा विकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजप यांच्यात वाद सुरू आहे. महा विकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी पण आमचा विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली आहे. विरोधी पक्ष भाजपने पण राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यावर राजकीय तज्ञ असणाऱ्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांसाठी बंधनकारक असतो.असे मत घटनातज्ञ डॉ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा अध्यक्ष करणे हे राज्यपालांच्या हातात असल्यामुळे राज्यपालांची भूमिका कायम घटनेशी सुसंगत असते.राज्य सरकार राज्यपालांना विनंती करू शकते. असे उल्हास बापट म्हणाले आहेत.
जर विधानसभा अध्यक्ष जर राज्यपालांनी ठरवला नाहीतर राष्ट्रपतींकडे राज्यपालांची तक्रार करता येते. असे मतही उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे. जर विधानसभा अध्यक्ष हा राज्यपालांनी ठरवला नाहीतर शेवटचा पर्याय सुप्रीम कोर्टात जाणे हाच असणार आहे. असेही उल्हास बापट म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading