Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

राज्यसरकारने  छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला व शंभुसृष्टीला निधी द्यावा -चंद्रशेखर घाडगे

पुणे: छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वढू प्रमाणेच तुळापूर या ठिकाणी व्हावे अशी तमाम शिव-शंभु प्रेमींची इच्छा आहे, राज्यसरकारने शौर्यपीठ तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला व शंभुसृष्टीला निधी मंजूर करून द्यावा. अशी  मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी केली आहे. 


वढू येथे छत्रपती संभाजीराजे यांचे भव्य स्मारक उभारण्यास शासनाने मान्यता दिली त्याबद्दल राज्यसरकाचे संभाजी ब्रिगेड च्या  वतीने अभिनंदन व धन्यवाद, परंतु शंभूराजे यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा देणारे हे स्मारक तुळापूर येथेही साकारावे,अशी मागणी संभाजी ब्रिगेडची आहे, दरवर्षी तुळापूर येथे होणाऱ्या शंभुराराज्याभिषेक सोहळा निमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहून राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्याकडून तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्याचा व शंभुराजेंचे भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन दिली जातात, पण प्रत्यक्षात काहीच केले जात नाही, 

तुळापूर येथे भव्यस्मारकासह शंभु सृष्टी साकारावी. तुळापूर येथे महिन्याला हजारो शिव-शंभु प्रेमी येत असतात, पण तेथे स्वछतागृह आणि इतर सुविधा नसल्या कारणाने शंभु प्रेमींची विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे याच्याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे. या संदर्भात संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा संघटक हनुमंत गुरव, सोशल मिडिया उपाध्यक्ष अशोक फाजगे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे,कामगार आघाडी चे अंकुश हाके, संतोष सुर्यवंशी, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष आदम तांबोळी, विठ्ठल सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, सरचिटणीस सनी थोपटे, लोकसभा अध्यक्ष राजेश गुंड, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, उपस्थित होते,

छत्रपती शंभुराजेंची वढू-तुळापूर ही दोन्ही प्रेरणास्थळे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातच आहेत,दोन्ही स्थळांचा समान विकासासाठी राज्यसरकारने प्रयत्न करावा, मात्र तुळापूर येथील विकास आराखडा वेळेत उपलब्ध न झाल्याने फक्त वढूचे सादरीकरण करण्यात आले असे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे आता ही चुकी नेमकी कोणाची आहे, हे त्यांचं वक्तव्य म्हणजे संशोधनाचा विषय आहे,परंतु वढूप्रमाणेच तुळापूर येथे शंभु स्मारक व तेथील विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी त्वरित निर्णय घ्यावा, असे घडगे यांनी म्हटले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading