शक्ती कायद्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मिठाई वाटप करून स्वागत
पुणे:आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यात ‘शक्ती कायदा’ लागू करण्याकडे राज्य सरकारणे एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुण्यात बालगंधर्व चौक येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून मिठाई वाटप करुन या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
या निर्णयाचे स्वागत रुपाली चाकणकर,अध्यक्ष – राज्य महिला आयोग प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला अध्यक्ष मृणाल वाणी, स्वाती गायकवाड, सविता मारणे, व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्टीच्या महिला कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रूपाली चाकणकर म्हणाल्या,आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यात ‘शक्ती कायदा’ लागू करण्याकडे राज्य सरकारणे एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यांचे स्वागत करण्यासाठी आज आम्ही मिठाई वाटून व नाचून आनंद व्यक्त करत आहे. शक्ती कायद्यामुळे महिलांना आता संरक्षण भेटणार आहे. असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.
