Monday, June 22, 2026
ENTERTAINMENTLatest News

अभिनेता सुनील पाल व एहसान कुरेशी जोडी पुन्हा एकत्र

चित्रपट हे माध्यम समाजामध्ये प्रबोधन आणि मनोरंजन करण्याचे मोठया प्रमाणात कामकरत असते. दुःख्याच्या वेदनांच्या वणव्यात होरपळून निघणाऱ्या मानवी मनाला हास्याच्यापावसात मनसोक्तपणे भिजवून माणसाच्या आयुष्यात गारवा आणण्याची क्षणात खळखळूनहसवणाऱ्या चित्रपटा त असते. असाच प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेण्यासाठी ‘पुणे टू गोवा’ हा चित्रपट येतोय. हिंदी चित्रपट, कॉमेडी शोमध्ये रसिकांना पोट धरून हसवणारी जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. ती म्हणजे अभिनेता सुनील पाल आणि एहसान कुरेशी ही जोडी काही वर्षांपूर्वी “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटात  एकत्र दिसले होती, हा चित्रपट त्या वर्षीचा सुपरहिट ठरला  होता. पुणे टू गोवाचे चित्रपटाचे अमोल भगत  दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती आदित्य राजे मराठे प्रॉडक्शन आणि मोर्या प्रॉडक्शन हे करणार आहेत. तर सह निर्माते किशोर खरात व योगेश गुजर हे आहेत.

 अभिनेता सुनील पाल व एहसान कुरेशी ही जोडी चित्रपटात धमाल करताना रसिकांना दिसणार आहे. सुनील पाल आणि एहसान कुरेशी म्हणाले की पुणे टू गोवा चित्रपट रसिकांना पोट धरून हसवले. आमच्या दोघांची विनोदाचे  टायमिंग आणि केमिस्ट्री खूप छान आहे. तरी लवकर पुणे टू गोवाचा प्रवास सुरु होतोय. रसिकांनी या प्रवासात  सहभागी व्हावे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading