एसटी कर्मचारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला सोडवता येत नसतील तर तिजोरी चा काय उपयोग?- चंद्रकांत पाटील
पुणे: जीवन प्राधिकरणाचे विलीनीकरण होत असेल. तर राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण राज्य सरकारने अजून केले नाही. त्यामुळे अजून एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. काल अजित पवार यांनी एसटीचे विलगीकरण होणार नाही असे म्हटले आहे. त्यावर सहा कोटी हे कर्ज राज्य सरकारने घेतले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ ,शेतकऱ्यांची कर्जमाफी हे राज्य सरकारने अजून सोडवले नाहीत. यांचे पगार कर्जमाफी जाता येत नसेल तर राज्य सरकार कडे
मोठी तिजोरी आहे .ही काही उपयोगाची नाही. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष वआमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.
चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार बरोबर विविध मुद्यांवर भाष्य केले. फोन टटॅपिंग प्रकरणात दोषी देवेंद्र फडवणीस एकदाही कोर्टात हजर राहिलेले नाहीत त्यांची काही चूक नाही ते कोर्टात त्यांची बाजू मांडतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पेपर फुटलेल्या प्रकरणात मोठ मोठे आरोपी सापडत आहेत. त्यावर पाटील म्हणाले, पेपर प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला आहे. मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे पोहोचले आहेत. आमचे नेत्यांचा कोणाचा जर हात असेल तर. त्यांना पण अटक करावी राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे असे.चंद्रकांत पाटील म्हणाले.
