fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

रविवारी झी मराठीवर पहा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, देवमाणूस आणि रात्रीस खेळ चाले ३ चे महाएपिसोड

झी मराठी वाहिनीवरील मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षक आपलंस करतात आणि त्या त्यांच्या जीवनाचा एक भागच बनून जातात असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. येत्या रविवारी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड सादर करणार आहे.
‘देवमाणूस २’या मालिकेने सुरुवाती पासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. देवमाणूस पुन्हा त्याच गावात परत आला आहे पण एका वेगळ्या रूपात हा देवमाणूसच आहे हि हा खुलासा या विशेष भागात होणार आहे. देवमाणूस २ चा १ तासाचा विशेष भाग रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले ३’हि मालिका देखील आता एका रंजक वळणावर आली आहे. कावेरी आणि सयाजी यांच्या माध्यमातून अण्णा आणि शेवंता एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात वेळोवेळी असफल पण होत आहेत. त्यामुळे ते एकत्र येणार कि नाही हे प्रेक्षकांना विशेष भागात पाहायला मिळेल. रात्रीस खेळ चाले ३चा १ तासाचा विशेष भाग रात्री १० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
लग्नसराई सुरु असताना झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि का  अस्सल गावाकडचं मराठी लग्नं! प्रेक्षकांना या २ तासांच्या विशेष भागातून पाहायला मिळेल. यात प्रेक्षकांना गावाकडच्या लग्नातील सगळ्या विधी, थाट आणि जल्लोष पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका सिद्धार्थ आणि अदितीचा लग्नसोहळा विशेष भाग रविवारी दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading