Thursday, June 25, 2026
Latest NewsPUNE

स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपने गंगा धाम रोड येथील उडान पुलाला मंजुरी दिल्याने आम्ही विरोध केला – प्रशांत जगताप

पुणे : देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना त्यांनी बिबवेवाडी गंगा धाम रोड येथील 90 कोटींच्या
उड्डाणपुलाला मंजुरी दिली होती. पण राज्यात भाजपची सत्ता गेल्यामुळे या उड्डाण पुलाचे काम थांबले. आज त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. टेंडर पास होण्याच्या आधी त्याला मंजुरी मिळाली असल्याने राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने याला विरोध केला.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यांशी आज पत्रकारांना संवाद साधला असता ते म्हणाले,  काल वृत्तपत्रात वेगवेगळ्या माध्यमातून हे टेंडर पास होण्याच्या आधी त्याला मंजुरी भेटली अशा विविध बातम्या छापून आल्या. आज झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गंगाधाम सोसायटी येथे होणाऱ्या उड्डाणपूल आणि अंडरपासचा प्रस्ताव चर्चेसाठी आला खरा मात्र हा रस्ता मंजूर होण्यापूर्वीच टेंडर फ्लोट झाल्यानं तो चर्चेचा विषय बनला. त्यामुळं राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना आणि मनसेकडून या विषयाला विरोध केला गेला.

पुढे बोलताना जगताप म्हणाले ,2017 साली महानगरपालिकेत भाजपची सत्ता, केंद्रात भाजपची सत्ता, व राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा हा विषय मंजूर केला गेला. महानगर पालिकेत सत्ताधारी भाजप ची सत्ता असल्यामुळे त्यांनी आजच्या सभेमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading