कोंढव्यात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा
पुणे : कोंढवा येथे पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग यांच्या माध्यमातून बुधवार (दि.22) अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.
इनक्रेडिबल समाजसेवक गृप, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ल रहमान बागवान यांच्या प्रयत्नातून हा अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी नागरिकांशी संवाद साधताना त्याचे हक्क आणि अधिकार तसेच केंद्र, राज्य, आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
पुणे मनपा समाज विकास विभागाच्या श्रध्दा यांनी पुणे महानगरपालिका योजनेची माहिती दिली. यावेळी गफूर शेख, मुजाहिद बागवान, असलम शेख, यासिन शेख, समिर पंजाबी ,सचिन आल्हाट यांनी आयोजनात सहकार्य केले. कार्यक्रमामध्ये कोविडचे नियम पाळून येथील स्थानिक महिला या उपस्थित होत्या. अब्दुल बागवान यांनी आभार मानले.
