ओबीसी आरक्षण : ओबीसी जनमोर्चाच्या वतीने ‘ओबीसी आक्रोश आंदोलन’
मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार विरोधात ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आज राज्यभर ‘ओबीसी आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनात केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला गेला. केंद्र व राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. दोन्ही सरकार केवळ एकमेकांकडे बोट दाखवण्यात व्यस्त आहे. यांच्या राजकीय वादात ओबीसींचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असा आरोप ओबीसी जनमोर्चाने यावेळी केला.
तसेच जोपर्यंत या मागण्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत ओबीसी जनमोर्चा पाठपुरावा करत राहणार आहे. त्यासाठी रस्त्यावरील लढाई शेवटपर्यंत लढली जाईल असे सांगण्यात आले. यावेळी अरविंद डफळे,माधव कांबळे,राजू झंजे,धनाजी धायगुडे,दत्ता येळे,पि.बी.कोकरे यांच्यासह ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी उपस्थिती होते.
या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या –
१)सन -२०२१/२०२२ जनगणना जातनिहाय करा २)स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्वरत करा.
३)ओबीसी विद्यार्थी – विद्यार्थीनीसाठी वसतिगृहे सुरु करा.
४)उच्च शिक्षणासाठी १००% शिष्यवृत्ती द्या.
५) नोकरीतील अनुशेष त्वरित भरा
६)महाज्योति व ओबीसी घटकातील आर्थिक विकास महामंडळांना भरीव आर्थिक निधी द्या.
