Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

ओबीसी आरक्षण : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 23 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा

पुणे : ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहेत. त्याला 3 अटी घालण्यात आल्या  आहेत. केंद्र सरकारला या विषयी माहिती देण्यात आली होती, मात्र याकडे सर्व पक्षदुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने यावेळी केला. तमिळनाडू सरकाने ओबीसीचे आरक्षण अबाधीत ठेवले आहे. ईमपरिकेल डेटा चुकीचा असल्याचे कोर्ट सांगते. भाजपने चुकीची माहिती देऊन ओबीसींची फसवणूक केली, असल्याचा आरोप बनसोडे यांनी यावेळी केला. त्यामुळे वंचित बहुजन अघाडीच्या वतीने 23 डिसेंबर रोजी मुबंई येथे विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सर्वजीत बनसोडे यांनी पत्रकार परिषेदेत दिली. या पत्रकार परिषदेत अनिल जाधव उपस्थित होते.
सर्वजीत बनसोडे म्हणाले, ओबीसी समाजावर अन्याय करण्यात येत असून त्यांना राजकारणा पासून दूर ठेवण्याचे षडयंत्र असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. महाराष्ट्रभरातून ओबीसी समाजात सामील होणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading