Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिक्षक भारती गैरव्यवहार : तुकाराम सुपे यांच्याकडून दोन कोटी रुपये व दागिने  हस्तगत 

पुणे : टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसानी अटक केलेली आहे. त्यांच्याकडे पहिल्या धाडीत ८८ लाखांची रक्कम आणि काही दागिने सापडले होते. त्यानंतर आता दुसर्‍या धाडीत त्याच्याकडून जवळपास दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा मिळून एकूण दोन कोटी रुपये आणि काही दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात आहे.  शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी १६ डिसेंबर रोजी तुमकाराम सुपे तसेच शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करीत असलेला अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची पुढील तपासकामी २३ डिसेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती.

तत्पुर्वी दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी तुकाराम सुपे यास अटक करून, तत्काळ त्याचे घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून या परीक्षेच्या माध्यमातून गैरलाभाने प्राप्त संपत्ती पैकी ८८ लाख ४९ हजार ९८० रुपये रोख व या संपत्तीतून खरेदी केलेले ५ ग्रॅम सोन्याचे नाणे, ५ तोळ्याचे दागिने व ५ लाख ५० हजार रुपायंची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

त्यापुढे पोलीस कोठडीतील तपासादरम्यान आरोपीने पैशाच्या दोन बॅगांपैकी त्याच्या मुलीकडे एक पैशांची बॅग ठेवल्याची तसेच त्याच्या जावायाने त्याच्या मित्राकडे आरोपीकडील दुसरी पैशांची बॅग ठेवल्याची माहिती मिळाल्याने आरोपीचा जावाई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांना पोलीस ठाण्यात चौकशीकामी बोलावून त्याबाबीच खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सुपे यांचे जावई  नितीन पाटील यांच्या चऱ्होली, आळंदी येथील कघरातून एक बॅग तर त्याचा मित्र विपीन याच्या वाघोली येथील बंद फ्लॅटमधून दोन बॅगा व एक सुटकेस ताब्यात घेण्यात आली. दोन पंचासमक्ष त्या उघडून त्यांची मोजदाद केली असता त्यामध्ये रोख रक्कम १ कोटी ५८ लाख ३५ हजार १० रुपये व वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आढळले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading