अभाविप व विवेक विचार मंचा तर्फे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर अध्यासन केंद्र इंटरंशिप प्रोग्राम’
पुणे : भारत सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेकांनी प्रयत्न केले. प्रत्येक गावाचे, घटनेचे, व्यक्तीचे, संस्थेचे आणि चळवळीचे आपले एक वेगळे महत्व राहिले आहे. यातील अनेक घटना, व्यक्ती, स्थान आणि संस्था आजही दुर्लक्षित राहिले आहेत. याच दुर्लक्षित घटकांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान शोधून ते प्रकाश झोकात आणून त्यातून प्रेरणा घेण्यासाठी अभाविप स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास केंद्र इंटरंशिप प्रोग्राम हा उपक्रम करीत आहे. अशी माहिती अभाविपचे पुणे महानगर सहमंत्री सोहम नारकर यांनी दिली.
सोहम नारकर म्हणाले ,डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांनी त्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन तिथली माहिती संकलित करावी अशी अपेक्षा आहे. त्या संकलित माहितीवर एक पुस्तक त्याच विद्यार्थ्यांच्या नावाने पुढील काळात प्रकाशित करण्याची योजना आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना इतिहास संशोधक आणि प्राध्यापक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणार आहेत. सोबत सहभागीता प्रमाणपत्र, प्रत्यक्ष संशोधनाचा अनुभव आणि आयुष्यभराची प्रेरणा मिळेल, असे सोहम नारकर म्हणाले
