Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

आम आदमी पक्षाच्या वतीने पुण्यात “आपणच होऊ नगरसेवक!” मोहीम 

पुणे :  पुणे महानगरपालिकेचे अनेक घोटाळे व भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनतेसमोर आलेली आहेत. नुकताच बोगस प्रमाणपत्र इंजिनियर पदोन्नती घोटाळा आपने उघडकीस आणला आहे. पुणेकरांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा घाट देखील याच महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. येथे जनतेचे राज्य चालू आहे की भ्रष्ट नगरसेवकाचे, बोगस अभियंत्यांचे, गल्लभरू कंत्राटदारांचे राज्य सुरु आहे? असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकराना पडत आहे. त्यात अजून भर म्हणजे राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाने त्रिसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचा निर्णय घेऊन ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकत्यांच्या व जनतेच्या आवाक्याच्या बाहेरची करून ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रामाणिक, धाडसी लोकांनी राजकारणात उतरून ही भ्रष्ट व्यवस्था बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा या दृष्टीने आम आदमी पक्षाच्या वतीने पुण्यात “आपणच होऊ नगरसेवक!” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती विजय कुंभार,राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष आम आदमी पाटी यांनी दिली.

विजय कुंभार म्हणाले ,आम आदमी पक्षाच्या विचारांना अनुसरून काम करण्याची इच्छा असणाऱ्या प्रामाणिक लोकांना संधी देण्याचे काम येत्या निवडणुकीत आम आदमी पक्ष करणार आहे. त्यासाठी या मोहिमेअंतर्गत https://aappune.org या वेबसाईटवर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरावा असे आवाहन करण्यात येत आहे. यातून आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल आणि योग्यतेनुसार उमेदवार निश्चित केले जातील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading