जायका प्रकल्पाच्या बाबतीत सत्ताधारी भाजपला आता जाग आली – सोनाली मारणे
पुणे : जायका प्रकल्पाला 2015 मध्ये म्हणजे सहा वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली आहे. पण भाजप सरकारला आता जाग आली असून पुण्यातील भाजप नेते आता जायका प्रकल्पासाठी ऑनलाइन मीटिंग घेत आहेत. पुणे महानगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने या हालचाली सुरू झाल्या आहेत. जायका प्रकल्पाचा निधी सत्ताधारी भाजपला पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या सुधारणेसाठी वापरता आला नाही! हे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी सडकून टीका पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी भाजप वर केली आहे.

सोनाली मारणे म्हणाल्या, मुळा-मुठा नदी ही पुण्याची ओळख मुळा मुठा या पुण्याच्या जीवनवाहिनी आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुण्याच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व लोकसंख्येमुळे पाण्याची अवस्था ही गंभीर बनली आहे . त्यामुळे प्रत्येकाचे आरोग्य जपणे हे आपले कर्तव्य आहे. जायका प्रकल्प हा पुणे महापालिका व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहिला आहे. आता या सत्ताधारी भाजप सरकारला जाग आली आहे.
