आंनदराज आंबेडकर यांची भिमा कोरेगावला अभिवादन सभा व शौर्य पहाट कार्यक्रम
पुणे : जिल्हा प्रशासनाने नुकतीच ८ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद पुणे या ठीकाणी भिमा कोरेगाव विजयरणस्तंभावर होणार्या १ जानेवारी २०२२ कार्यक्रम संदर्भात नियोजन बैठक घेतली यंदा सर्व पारंपारीक कार्यक्रम होणार असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त ,व तहसिलदार यांच्या वतीने सांगण्यात आले.
रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांच्या वतीने रिपब्लिकन सेना सरसेनानी आंनदराज आंबेडकर व भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष,समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भिमराव आंबेडकर, मनिषाताई आंबेडकर, अमन आंबेडकर यांच्या उपस्थितीत पहाटे ६ वाजता शाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत शौर्य पहाट, शौर्य दिनाची शौर्य पहाट बुध्द व भिम गीते सकाळी ८ वा. भारतीय बौध्द महासभेतर्फे बुध्द वंदना सकाळी ९ ते ११ वाजता समता सैनिक दलाची पारंपारीक बँड पथकासह सलामी परेड ,सकाळी ११ ते १ भारतीय बौध्द महासभा कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांची अभिवादन सभा दुपारी १ ते ३ रिपब्लिकन सेना सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांची अभिवादन सभा होणार आहे. यंदाही पारंपारीक कार्यक्रम यावर्षी होणार आसल्याचे आयोजक रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी बैठकीत सांगितले.
सदर बैठकीत कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी विजयस्तंभास फुलाची सजावट ,३१ डिसेंबर १२ वा विद्युत रोषणाई ,भन्ते ज्ञानज्योती यांची धम्मपद समितीच्या वतीने करणार असल्याचे सांगितले यावेळी रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे ,रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख दिपक जगताप ,विशाल म्हस्के कमलेश चाबुकस्वार, दिपांकर इगोले याच्यासह आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते
