Saturday, June 20, 2026
Latest NewsLIFESTYLE

व्यसनमुक्तीसाठी उपयुक्त हर्बल सिगारेट व ती बनविण्याच्या समग्र पद्धतीला पेटंट  

पुणे  : व्यसनमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकत असताना आयुर्वेदिक उपचार पद्धतीमधली ‘धूम पान’ या पद्धतीवर शास्त्रीय संशोधन करीत पुण्यातील वैद्य अनंत निस्तुरे, त्यांचा मुलगा डॉ. उदय निस्तुरे व नातू डॉ. राजस निस्तुरे यांनी तब्बल ५० वर्षे केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. त्यांच्या प्रदीर्घ संशोधनावर आधारित ‘मारुक’ या उत्पादनाला व ते तयार करण्याच्या समग्र पद्धतीला भारतीय पेटंट मिळाले असून अनंतवेद रिसर्च लॅब्ज यांच्या वतीने आता या हर्बल सिगारेटचे उत्पादन घेण्यात येईल.

याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. राजस निस्तुरे म्हणाले, “आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांचा धूर अनेक व्याधींवरील उपचार करताना मानवासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र तो योग्य प्रमाणात शरीरापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष साधने, तंत्र याची माहिती उपलब्ध नव्हती. आयुर्वेदातील चरक संहिता, सुशृत संहिता व वाग्भट संहिता यामध्ये उल्लेख असलेले धूम पान अर्थात हर्बल मेडिकेटेड स्मोक यावर सखोल संशोधन करीत त्यात आयुर्वेदिक तेल, अर्क व वनस्पती यांसारख्या इतर घटकांचा समावेश आम्ही केला. कोणतीही गोष्ट इनहेल करण्यासाठी सिगारेट हे एक सोपे माध्यम आहे, म्हणून यातून ‘मारुक’ या हर्बल सिगारेटची निर्मिती करण्यात आली.”

केवळ हर्बल सिगारेटच नाही तर ती तयार करण्याची प्रक्रिया, हर्बल सिगारेटचे फॉर्म्युलेशन व कॉम्बिनेशन्स या सर्वांसाठी आम्हाला हे पेटंट मिळाले असल्याचेही, डॉ निस्तुरे यांनी सांगितले.

‘धूम पान’ या आयुर्वेदिक स्मोक थेरपी विषयी आपल्याकडे कमी ज्ञान आहे, शिवाय यावर पुढे संशोधन झाले नसल्याचे समोर आल्यानंतर त्याचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा, या उद्देशाने आम्ही या उत्पादनाची निर्मिती केली आहे असे सांगत ते म्हणाले, “प्राचीन आयुर्वेद पद्धतीसोबतच त्याच्याशी संबंधित विज्ञान जगासमोर यावे व आजच्या सोयीस्कर पद्धतींद्वारे त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा हा आमचा उद्देश होता. नित्सुरे कुटुंबाच्या तब्बल ५० वर्षांच्या संशोधनाला यश आले याचा आम्हाला अभिमान आहे.”

मारुक ही एक प्रकारची हर्बल सिगारेट असून तंबाखू सिगारेट ओढणा-यांना त्या ऐवजी ही हर्बल सिगारेट देत तंबाखू सिगारेटची सवय मोडण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू तंबाखू सिगारेट पूर्णपणे बंद झाल्यावर या हर्बल सिगारेटमुळे व्यसनमुक्ती झाल्यानंतर सिगरेट ओढण्याची इच्छा व रस कमी झाल्याने ती व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकते. तंबाखू सिगारेट सोबतच निकोटीन पॅच व निकोटीन च्युईंगम यांवर देखील ही पद्धत प्रभावीपणे वापरता येऊ शकतो, असे यांनी नमूद केले.

आज अनेक डॉक्टर हे उत्पादन रूग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरतात. मागील १३ वर्षांपासून हे उत्पादन वापरात असून २०१९ साली ‘मारुक’ या नावाने त्याचे पुर्नब्रँडिंग करण्यात आले आहे. हे उत्पादन सध्या अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या ठिकाणी असून पुणे, महाबळेश्वर व गोवा या ठिकाणी काही आऊटलेट्समध्ये ते प्रत्यक्ष विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे. व्यसनमुक्त होण्यासाठी व सिगारेटचे व्यसन सुटण्यासाठी देखील याचा चांगला उपयोग होत असल्याचे अनेक वापरकर्त्यांचे अनुभव आहेत.

२०११ सालापासून पेटंट मिळविण्याची प्रक्रिया सुरू होती, आता ते मिळाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत त्यांना या व्यसनमुक्तीच्या नव्या पद्धतीची माहिती देणे, पुण्यात व्यसनमुक्तीसाठी एक सेंटर उभे करणे. नजीकच्या भविष्यात भारतभर याचा प्रसार व प्रचार करणे, हे आमचे उद्दिष्ट्य असेल, असेही डॉ. निस्तुरे यांनी सांगितले. या हर्बल सिगारेटच्या १० पॅकेटची किंमत ही रु.२५० इतकी असून, ऑनलाईन व्यासपिठावर त्यावर डिस्काउंट मिळू शकेल.

 

फोटो : गुगल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading