Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे उद्घाटन वंदना शिवा तर समारोप सुनीता नारायण करणार


पुणे: पंधरावा किलोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मंगळवार दिनांक 14 ते शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रसारित करण्यात येईल.
भारतीय पर्यावरण वादी शाश्वत विकासाच्या डॉक्टर वंदना शिवा यांच्या हस्ते 14 डिसेंबर रोजी महोत्सवाचे उद्घघटन होणार आहे .तर पुरस्काराच्या सुनीता नारायण दिल्ली यांच्या हस्ते 17 डिसेंबरला महोत्सवाचा समारोप होणार आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे मॅनेजर अमित फडके यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला सुवर्णा भांबुरकर, नयनिश देशपांडे उपस्थित होते .
अमित फडके म्हणाले , सकस अन्न समृद्ध निसर्ग आरोग्यपूर्ण हा समाज महोत्सवाचा विषय आहे.
उद्घाटन सोहळ्यात डॉक्टर शुभलक्ष्मी रेड्डी यांना ग्रीन टीचर व शारदा सुब्रमण्यम यांना इको जर्नलिस्ट ुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र ,व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आरती किलोस्कर, निमंत्रक गौरी किलोस्कर, वीरेंद्र चित्राव महोत्सव संयोजक, महोत्सवादरम्यान आपले विचार मांडणार आहेत. असे अमित फडके म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading