Sunday, November 1, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात 

तामिळनाडू :  सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे प्रवास करीत असलेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला आज तामिळनाडू मधील कुंंन्नूर येथेअपघात झाला.  या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या  हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 14 जण प्रवास करत होते. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत हे त्यांच्या पत्नीसह या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा  झाला? याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अपघात इतका भीषण होता की यातील प्रवाश्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाणार असल्याचे एएनआयने आपल्या वृत्तात सांगितले आहे. या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी आणि लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, यावर आता कॅबिनेटच्या सुरक्षा समितीने संध्याकाळी 6.30 वाजता बैठक बोलावली आहे.

Leave a Reply