Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

‘जरा याद उन्हे भी कर लो’ अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पुणे : निर्माण प्रतिष्ठानच्या वतीने आणि भारती विद्यापीठ कला महाविद्यालयाच्या सहयोगाने ‘जरा याद उन्हे भी कर लो’ अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित ही चित्रकला स्पर्धा असणार आहे. यामधून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी आणि महत्त्वाच्या घटना यांचे महत्व भारतीयांना कळावे, यासाठी या आगळ्यावेगळ्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी 2022 पर्यंत चित्रकारांना चित्रे पाठवता येणार असून विजेत्यांना तब्बल 10 लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक नितीन शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी निर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन वेदपाठक, गुरचरणजीतसिंग संधू, भारती विद्यापीठ कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. अनुपमा पाटील, सिनेटचे माजी सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. स्पर्धेची संकल्पना नितीन शास्त्री यांची आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वर्णीम विजय वर्ष ही स्पर्धेची संकल्पना असणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा, भारतीय क्रांतिकारी आंदोलन, स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र दलाने दिलेला लढा हे या स्पर्धेचे विषय असणार आहेत.

ही स्पर्धा 8 गटांमध्ये होणार असून शालेय गट आणि खुला गट अशी विभागणी करण्यात आली आहे. ऑईल पेटींग, वॉटर कलर, अॅक्रेलीक आणि स्केच यामाध्यमात चित्रे पाठवता येणार आहेत. प्रत्येक ग्रुपसाठी 3 पारितोषिके देण्यात येणार असून. त्यासोबतच 10 विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेनंतर देशातील काही मुख्य शहरांमध्ये स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8766097885 या क्रमांकावर संपर्क करता येईल, तसेच                   http://theoffbeatdestinations.com/ या संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading